रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: रविवार, 14 मार्च 2021 (08:50 IST)

पनीर ताजे ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पनीर जे प्रत्येकाला आवडते. परंतु ते लवकर वापरले नाही तर खराब होतो. आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण पनीर 2 दिवस तर काय 2 महिन्या पर्यंत चांगले ठेवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टिप्स. 
 
1 पनीर पाण्यात ठेवा-
जर आपल्याला पनीर दोन दिवस साठवून ठेवायचे आहे तर आपण पनीर पाण्यात ठेवा. या साठी आपल्याला एका भांड्यात पाणी भरून  त्यामध्ये पनीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे लागणार. लक्षात ठेवा की पनीर बुडवून ठेवायचे आहे. अन्यथा ते कडक होईल. आणि आंबटचव देखील येते आणि त्यावर पिवळसर पणा देखील येतो.  
 
2 मिठाच्या पाण्यात ठेवा- जर आपल्याला आठवड्यासाठी पनीर ताजे ठेवायचे आहे तर हे मिठाच्या पाण्यात ठेवा. या साठी आपण एका वाडग्यात पाणी भरून एक चमचा मीठ घालून त्यामध्ये पनीर बुडवून ठेवा. त्यावर झाकण ठेवून द्या 2 दिवसा नंतर पाणी आणि भांडे बदलून द्या. अशा पद्धतीने आपण पनीर 8 -10 दिवस साठवून ताजे ठेवू शकता.   
 
3 झिपलॉक बॅग मध्ये ठेवा-
पनीर महिन्यासाठी साठवून ठेवायचे असल्यास पनीराचे  तुकडे करून  एका ट्रे मध्ये ठेवा आणि ट्रे  फ्रीजर मध्ये ठेवून द्या. पनीर कडक झाल्यावर झिपलॉक बॅगेत फ्रीजर मध्ये ठेवा. पनीरची भाजी करावयाची असल्यास पनीर चे तुकडे फ्रीजर मधून काढून काही वेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवा आपण बघाल की हे मऊ पडेल अशा प्रकारे आपण पनीर एका महिन्या पर्यंत वापरू शकाल.