गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (21:30 IST)

काही सोप्या कूकिंग टिप्स आणि ट्रिक्स -

Here are some simple cooking tips and tricks -
काही सोप्या कूकिंग टिप्स आणि ट्रिक्स -
 
 
फळांना कापून किंवा चिरून ठेवण्यासाठी टिप्स- 
 
1 फळांचे मोठे तुकडे करा- 
 
2  फळे सालासहित वापरा, कारण सालांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक आढळतात. जर आपणास सालपट काढायचेच आहे तर पातळ काढा.  
 
3 भाज्या दोन ते तीन पाण्याने धुवून स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. स्वयंपाक करताना ते पाणी  कणिक मळण्यासाठी वापरू शकता.  
 
4  शिजवताना किंवा शिजल्यावर भाजीला झाकून ठेवा. अन्यथा यामधील पोषक घटक पाण्यासह निघून जातील.  
 
5 फळाचे कापलेले तुकडे किंवा भाजीचे तुकडे हवाबंद डब्यात ठेवा. शक्य असल्यास चिरलेली भाजी किंवा फळे लवकर वापरा.
 
6 भाजी शिजवताना त्यामध्ये जास्त पाणी घालू नका. असं केल्यानं त्यामधील पौष्टीक घटक नाहीसे होतात. तसेच भाजी जास्त शिजवू नका.
 
7 स्वयंपाक बनविण्यापूर्वी आपले हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. भांडे देखील धुवून वापरा.  
 
8 फ्रिज दर आठवड्याला स्वच्छ करा.
 
9 शिजवलेल्या अन्नाला दोन तासाच्या आत फ्रिज मध्ये ठेवून द्या. असं केल्यानं ते खराब होणार नाही.  
 
10 - दूध किंवा दुधाचे पदार्थ दही, अंडी, मासे, कोंबडी हे लवकर खराब होतात या मध्ये लवकर बेक्टेरिया होतात म्हणून हे पदार्थ लवकर वापरावे.  
 
11 फळे किंवा भाजी धुण्यापूर्वी त्यावरील स्टिकर काढून घ्या.  
 
12 फळे किंवा भाज्या खराब झाल्या असतील तर किडलेला भाग कापून द्या. नंतर थंड पाण्यात धुवावे किंवा व्हिनेगरच्या पाण्यात किंवा मिठाच्या पाण्यात 5 ते 10 मिनिटे भिजवून ठेवा. नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून वापरा.