गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (13:19 IST)

मेथी- पालक स्वच्छ करण्यासाठी सोपे उपाय

vegetable
पालेभाज्या बनवण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित धुणे आवश्यक आहे. पालेभाज्या धुतल्याने त्यांच्याशी लागलेले किडे तसेच माती निघून जाते आणि त्यामुळे भाज्या व्यवस्थित साफ होतात. पण काही वेळा मला पालेभाज्या साफ करताना विशेषत: पालक किंवा मेथी स्वच्छ करताना त्रास होतो. अशात पालेभाज्या अधिक वेळा धुवाव्या लागतात. तुम्हालाही याच समस्येचा सामना करावा लागत असल्यास काही टिप्स जाणून घ्या ज्याने पालेभाज्या सहज स्वच्छ करता येतात.
 
बेकिंग सोडा वापरा- मेथी- पालक स्वच्छ करण्यासाठी प्रथम एका भांड्यात भाजी ठेवून त्यात पाणी घाला. यानंतर तुम्हाला एक छोटा चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर त्यात भाजी 10 मिनिटे राहू द्या. नंतर पालेभाजी पाण्याने स्वच्छ करून नीट वाळू द्या. अशा प्रकारे भाजी साफ होईल.
 
नेट व्हेज बॅग्ज वापरा- कमी वेळात भाजी स्वच्छ करायची असल्यास भाजीची जाळी असलेली पिशवी वापरा. प्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात भाजीची पिशवी ठेवा. मग त्यात भाजी ठेवा आणि पिशवी पाण्यात भिजवा. असे तीन-चार वेळा केल्यावर भाजी व्यवस्थित स्वच्छ होईल. अशा प्रकारे भाजी अगदी कमी वेळात स्वच्छ करता येईल. तरी तुम्हाला भाजी पूर्णपणे स्वच्छ दिसत नसेल तर तुम्ही पुन्हा स्वच्छ पाण्याने भाजीला स्वच्छ करा. 
 
नेचरल फ्रूट एंड व्हेजिटेबल क्लिनर वापरा- भाजी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक क्लिनरचा वापर करावा. हे क्लिनर बाजारात सहज मिळतं. ते वापरण्यासाठी एका भांड्यात भाजी ठेवा आणि त्यात क्लिनर घाला, नंतर काही वेळानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. अशा प्रकारे भाजी व्यवस्थित स्वच्छ होईल.