शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (07:50 IST)

गव्हाच्या पिठात कीटकांचा प्रादुर्भाव होतो का? साठवण्यापूर्वी करा ही एक गोष्ट

स्वयंपाक घरात अश्या काही वस्तू असतात की ज्या जास्त दिवस राहिल्या तर खराब होतात. त्यापैकीच एक आहे गव्हाचे पीठ. तसेच जास्त दिवस गव्हाचे पीठ पडून राहिल्यास त्यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव निर्माण होतो. याकरिता आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे गव्हाचे पीठ जास्त दिवस टिकून राहील.
 
डब्बा स्वच्छ करून ठेवा- 
गव्हाचे पीठ स्टोर करण्यापुर्वी डब्बा स्वच्छ करून घ्यावा. दोन तीन पाण्याने धुवून डब्बा स्वच्छ धुवून घ्यावा. कारण जर डब्बा ओला राहिला तर किडे पडू शकतात. तसेच या गोष्टींकडे लक्ष ठेवा की डब्बा ठेवतात ती जागा देखील स्वच्छ असावी. ओलावा नसावा.
 
कडुलिंबाचे पाने-
गहू साठवताना त्यांमध्ये कडुलिंबाचे पाने घालावे. यामुळे किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही व गहू फ्रेश राहतील.   
 
काडेपेटी-
तुम्हाला थोडेसे हे वेगळे वाटेल पण गव्हामध्ये काडेपेटीच्या काड्या ठेवल्यास गव्हामध्ये किडे होत नाही.  
 
वाळलेली लाल मिरची-
गहू स्टोर करण्यासाठी त्यामध्ये लाल मिरची घालावी यामुळे किड्यांचा प्रादुर्भाव निर्माण होत नाही.  
 
पुदिन्याचे पाने-
गहू स्टोर करतांना त्यामध्ये वाळलेले पुदिन्याचे पाने घालून ठेवावे. यामुळे गव्हाला कीड लागत नाही. या पानांचा गर्द सुगंध किड्यांचा प्रादुर्भाव थांबवतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik