शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:35 IST)

Kitchen Hacks: हिरवी मिरची पावडर घरी बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Kitchen Hacks: Follow these tips to make green chili powder at home to make green chili powder at home Follow these tips  Kitchen Hacks In Marathi Kitchen Hacks: हिरवी मिरची पावडर घरी बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा In Marathi KItchen Hacks In Marathi Webdunia Marathi
ज्यांना तिखट चमचमित खाणे आवडते ते लोक स्वयंपाक करताना त्यात हिरवी मिरची वापरतात. पण अनेक वेळा फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवल्यानंतरही हिरव्या मिरच्या सुकतात आणि खराब होतात. आपण या काही सोप्या टिप्स अवलंबून आपण हिरव्या मिरचीची पूड घरीच बनवू शकता एवढेच नाही तर ती पूड बऱ्याच महिन्या पर्यंत साठवून ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.  
 
1 हिरवी मिरची पावडर घरी बनवण्याच्या टिप्स- भेसळ टाळण्यासाठी आपण घरच्या घरी हिरवी मिरची पावडर बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम 500 ग्रॅम किंवा 1 किलो हिरव्या मिरच्या घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे स्वच्छ करा आणि एका भांड्यात ठेवा. यानंतर सर्व हिरव्या मिरच्यांचे दोन भाग करून एक ते दोन दिवस उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. आता मिक्सरमध्ये तेलाचे एक ते दोन थेंब टाका आणि सर्व चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
2 हिरवी मिरची पावडर बनवण्याची दुसरी पद्धत- हिरवी मिरची पावडर बनवण्यासाठी प्रथम 500 ग्रॅम-1 किलो हिरवी मिरची साफ केल्यानंतर हिरव्या मिरच्या मधून  दोन भागांत कापून घ्या आणि एका भांड्यात ठेवा. आता मायक्रोवेव्ह चालू करा आणि 5 मिनिटे हिरव्या मिरच्या सुकवा.5 मिनिटांनंतर हिरवी मिरची मायक्रोवेव्हमधून काढून मिक्सरमध्ये टाकून बारीक दळून घ्या.
 
हिरवी मिरची पावडर अशा प्रकारे साठवा-
आपण अनेक महिने सहज हिरवी मिरची पावडर साठवू  शकता. हिरवी मिरची पावडर साठवण्यासाठी काचेच्या भांड्याची किंवा हवाबंद कंटेनरची निवड करा. पावडर वापरल्यानंतर झाकण नेहमी घट्ट बंद करा.