गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

किचन स्वच्छ ठेवण्यासाठी 7 सोपे टिप्स

रोज घर किंवा किचन स्वच्छ करायला आजकालच्या बायांना मुळीच वेळ नसतो. जर आपण एक बिझी आई किंवा गृहिणी आहात तर हे सोपे उपाय अमलात आणून आपले किचन चकचकीत करा:
 
कॅबिनेट्स
कॅबिनेट्सवर लागलेले तेलाचे डाग ऑलिव्ह ऑयलने स्वच्छ करा. टिशू पेपरवर ऑलिव्ह ऑयलचे काही थेंब घेऊन तेलाचे डाग मिटवा.

फ्रीज 
फ्रीजच दार उकळलेल्या बटाट्याचा सालांनी स्वच्छ केले जाऊ शकतात. 


 
डाइनिंग टेबल
डाइनिंग टेबलाला स्वच्छ करण्यासाठी नीलगिरीचे तेल कामास घ्या. जर टेबलाहून दुर्गंध येत असेल तर एखाद्या कापडावर नीलगिरी तेलाचे काही थेंब टाकून त्याने पुसून घ्या.


स्टोव 
स्टोव स्वच्छ करण्यासाठी संत्र्याचे साल वापरा. याने सुवास ही येतो.

नळ
किचनमधील नळ चकचकीत करण्यासाठी त्यावर थोडंसं टूथपेस्ट लावा आणि गरम पाण्याने धुऊन टाका.

डस्टबिन 
किचनमध्ये जिथे डस्टबिन ठेवत असाल ती जागा नियमितपणे फेनिल टाकून स्वच्छ करायला हवी कारण सर्वात जास्त घाण तिथेच जमते आणि अशाने बॅक्टीरिया पसरतात. किचनमध्ये नेहमी झाकण असलेले डस्टबिन वापरा.

खिडकी आणि दार
किचनची काचेची खिडकी आणि दार घाण झाले असल्यास गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने काच स्वच्छ करा. याने माती आणि चिकट डाग आरामात स्वच्छ होऊन जातात.