रविवार, 6 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 5 एप्रिल 2025 (16:00 IST)

कारल्यातील कडूपणा अश्या प्रक्रारे काढून टाका

Kitchen Tips : कारले ही एक आरोग्यदायी भाजी आहे. मधुमेहात डॉक्टर कारले खाण्याचा सल्ला देतात. पण कारल्याच्या कडूपणामुळे अनेकांना ते खायला आवडत नाही. विशेषतः मुले कारले खाणे टाळतात. कारल्याची भाजी कडू असते अशी तक्रार अनेक लोक करतात. आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी काही ट्रिक सांगणार आहोत यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही.
1.कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी त्याची साल सोलणे सर्वात महत्वाचे आहे. कारल्याची सर्व खरखरीत साल काढून टाका. त्यात सर्वात जास्त कडूपणा असतो.

2.कारल्याची कडूपणा निघुनजाण्यासाठी त्यात मीठ घालून ते थोडा वेळ बाजूला ठेवा, यामुळे कारल्याचा कडूपणा दूर होईल. मिठामध्ये असलेले खनिजे कारल्याचा कडू रस काढून टाकतात.  

3.कारले कापताना त्याच्या सर्व बिया काढून टाका. कारल्याच्या बिया देखील कडू असतात. कारले चिरतांना सुरीच्या मदतीने त्यामधील बिया काढून टाका.   
 ALSO READ: या भाज्यांमध्ये चुकूनही टोमॅटो घालू नये, चव बिघडू शकते
4.कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही दही देखील वापरू शकता. यासाठी कारल्याचे छोटे तुकडे करा आणि ते दह्यात किमान एक तास ठेवा. यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जाईल.  
5.जर तुम्ही सुक्या कारल्याची भाजी बनवत असाल तर त्यात कांदा आणि बडीशेप वापरा. यामुळे भाजीतील कडूपणा निघून जाईल.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik