शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (17:29 IST)

प्रत्येक गृहिणीच्या कामी येणारे सोपे आणि लहान लहान किचन टिप्स

Simple and easy kitchen tips for every housewife
गृहिणीचा जास्त वेळ किचन मध्ये जातो. त्या स्वयंपाकात कुशल बनतात. पण काही चुका त्यांच्या कडून होतात आणि त्यांना काही समस्यांना सामोरी जावे लागते. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले काम सोपे होतील. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* पनीर बनवताना दुधाचे पाणी वाचते या मध्ये कणीक मळून पराठे बनवू शकता. पराठे चविष्ट बनतात. 
 
* मिक्स व्हेज कटलेट बनविण्यासाठी भाज्या उकळवून त्या पाण्याला फेकून न देता वरण किंवा सूप मध्ये मिसळा. चांगली चव येईल.  
 
दुधी भोपळ्याचा शिरा बनवताना त्यात मलई घालून परतून घ्या. चांगली चव येईल.
 
दही बडे करताना वाटलेल्या उडीद च्या डाळी मध्ये दही मिसळून फेणून घ्या. दही बडे चविष्ट आणि मऊ बनतात. 
 
* मोड आलेले कडधान्य जास्त काळ चांगले ठेवायचे असल्यास त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून फ्रीज मध्ये ठेवा. 
 
* कचोडी मऊ करण्यासाठी मैद्यात दही मिसळून मळून घ्या. 
 
* दही जमविताना दुधात नारळाचा तुकडा घातल्यावर दही दोन ते तीन दिवस ताजे राहते. 
 
* मूगडाळीचे धिरडे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये 2 मोठे चमचे तांदुळाचे पीठ मिसळा. 
 
* पनीर किंवा चीज किसतांना किसणीवर तेल लावा किसणीला पनीर किंवा चीज चिटकणार नाही. 
 
* पेपर डोसा कुरकुरीत हवा असल्यास पिठात 2 चमचे मक्याचे पीठ मिसळा. 
 
* साजूक तूप जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी त्यामध्ये 1 तुकडा गूळ आणि एक तुकडा सैंधव मीठ घाला.