बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (08:43 IST)

...म्हणून चिकटत नाही अन्न

तुमच्या घरात नॉनस्टीक पॅन असेल. नॉनस्टीक भांड्यांमध्ये अन्न चिकटून बसत नाही. यामुळे आजकाल अशा भांड्यांचा सर्रास वापर होतो. अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यांना अन्न चिकटून बसत असताना नॉनस्टीक भांड्यांमध्ये कोणते वेगळे तंत्र वापरले जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
 
नॉनस्टीक भांड्यांना ‘टेफ्लॉन'चा थर दिलेला असतो. ‘टेफ्लॉन' हे फ्लोरिनयुक्त पॉलिमर आहे. ‘पोलिटेट्रा फ्लोरो एथिलीन' हे या घटकाचं रासायनिक नाव आहे. हा घटक उष्णतेला प्रतिकार करतो. टेफ्लॉनचा घर्षण गुणांकही खूप कमी असतो. 1930 मध्ये एका प्रयोगशाळेतल्या प्रयोगादरम्यान टेफ्लॉनचा शोध लागला. टेफ्लॉनचा वापर फक्त भांड्यांमध्येच होतो असं नाही तर वॉटरप्रूफ कपडे, कॉम्प्युटर चिप, स्टेडियमचं छप्पर अशा ठिकाणीही त्याचा वापर होतो.