उपयोगी सोपे किचन टिप्स
* चापिंग बोर्डवरील डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घाला त्यावर एक लिंबू पिळा आणि त्याचे पेस्ट बनवून चापिंग बोर्ड वर पसरवून द्या आणि 20 मिनिटे तसेच ठेवा नंतर स्टील च्या स्क्रबर ने स्वच्छ करा डाग नाहीसे होतील.
* मसाले खराब होऊ नये त्यासाठी त्यांना फ्रिजमध्ये ठेवा.
* केळी लवकर खराब होऊ नये या साठी त्याच्या वरील भागास वॉल पेपर गुंडाळून ठेवा.केळी खराब होणार नाही.
* कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी त्याची देठ काढून घ्या. एका हवाबंद डब्यात किचन टॉवेल पेपर अंथरून द्या आणि त्यावर कोथिंबीर ठेवा आणि पुन्हा वरून पेपर नेपकीन घाला. कोथिंबीर ताजी राहील.
* कांद्याची उग्र वास हातात राहते टी काढण्यासाठी हातावर बेकिंग सोडा घाला आणि रगडून स्वच्छ करा. कांद्याची वास नाहीशी होईल.
* पोळी बनवताना कणिक मळताना त्यात मीठ घालून पाणी घालून ठेऊन द्या आणि 10 ते 15 मिनिटे कणिक तसेच ठेवा. पोळ्या मऊ बनतील आणि फुगतील.