मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (14:28 IST)

ऑम्लेट बनवताना किंवा नंतर भांड्यांना वास येतो, मग या किचन टिप्स अवलंबवा

अंड्यांमध्ये भरपूर पोषण असते. हिवाळा सुरू झाला की बहुतेक घरांमध्ये त्याचा वापर वाढतो. मग ते ऑम्लेट असो, उकडलेले अंडे किंवा अंड्याची करी, लोक अनेक प्रकारे आवडीने खातात. मात्र, यामध्ये एक समस्या आहे की, अंडी बनवल्यानंतर वास येतो. बहुतेक लोकांना हा वास आवडत नाही. विशेषत: ऑम्लेट बनवताना अंड्यांचा वास तर येतोच, त्याचप्रमाणे भांड्यांनाही नंतर दुर्गंधी येत राहते. येथे काही टिप्स आहेत ज्याद्वारे आपण या समस्येपासून मोठ्या प्रमाणात सुटका मिळवू शकता.
 
* अंड्याचा पिवळा भाग जळायला लागल्यावर जास्त वास येतो. त्यामुळे लक्षात ठेवा की नेहमी मंद आचेवर ऑम्लेट बनवा. यामुळे थोडा वेळ नक्कीच लागेल पण संपूर्ण घरात वास कमी पसरेल. 
 
* काही अंडी अशी असतात की जी जास्त काळ ठेवली जातात, त्यांना जास्त वास येतो. ताजी अंडी खाण्याचा प्रयत्न करा.
 
* अंडी फेटतांना त्यात थोडे दूध घाला. तव्याला किंवा पॅनला चांगले ग्रीस करून थोडा जाडसर थर ठेवा. गॅस मंद ठेवा. लक्षात ठेवा पॅन जास्त गरम करू नका, कारण यामुळे अंडीचा पिवळा भाग जळल्यावर त्याचा वास पसरण्याची शक्यता वाढते.
 
* तव्यावर किंवा पॅन मध्ये ऑम्लेट टाकल्यावर झाकण ठेवून शिजवून घ्या, या मुळे त्याचा वास येणार नाही आणि हा फुगेल.ऑम्लेट बनल्यावर वरून कोथिंबीर आणि लिंबाच्या  काही थेंब पिळून घ्या.
 
* ज्या भांड्यांमध्ये अंडी फेटली जातात त्यात लिंबू टाकून ठेवा. शक्यतो अंडी बनवताच भांडी पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा. नंतर लिंबू घालून ठेवा. अंड्याची भांडी वेगळी धुवा आणि त्यात वापरलेले स्क्रबर वेगळे ठेवा नाहीतर वास सर्व भांड्यांना लागेल.