शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. लव्ह शायरी
Written By वेबदुनिया|

जीवन सागर

सौ. स्वाती दांडेकर

ND
जीवन असे हे सागरापरी
किती तरी रम्य विशाल अनुपम
अनेक आठवणी बालगीत उराशी
कधी असे भरती कधी असे ओहटी
जीवन असे ही तडजोड शेवटी
घेत असते परिक्षा कर्तव्याची
त्यागाची नाव घेऊनी
कर्तव्याची पतवार लावुनी
विश्वासाची साथ घेऊनी
पार करावी जीवन नैया.