Daily Horoscope

लग्नाच्या पाच वर्षांनंतर...

Updated: गुरूवार, 31 मे 2018 (13:54 IST)
 
हनीमून 
लग्नानंतरचं पहिलं वर्ष हे हनीमून पिरीयडसारखं असतं. आजूबाजूला सगळंच चांगलं वाटत असतं. पण जसजसे दिवस पुढे जातात, दोघेही हनीमून पिरीयडमधून बाहेर येऊ लागतात. जीवनाकडे वेगळ्या नजरेने ते पाहायला लागतात. पण जे लोक या हनीमून मूडमधून बाहेर येत नाहीत, त्यांचं नातं अडचणीत येण्याची अधिक शक्यता असते.
दुसरं वर्ष
लग्नाच्या दुसर्‍या वर्षात पती-पत्नी एकेमेकांचे स्वभाव आणि एकमेकांच्या सवयी जाणून असतात. चांगल्या सवयीचं काही नाही, पण वाईट सवयीमुळे खटके उडायला लागतात. त्यामुळे सतत छोटी छोटी भांडणं होऊ लागतात. दुसर्‍या वर्षात आर्थिक आणि मानसिक अडचणी, तसेच फॅमिली प्लॅनिंग याचाही विचार असतो त्यामुळे रोमान्स जरा कमीच होतो.
बोलणं कमी 
लग्नाच्या दोन-तीन वर्षांनंतर पती-पत्नी आपापल्या जबाबदार्‍यांमध्ये इतके गुंतले जातात की, त्यांना एकेकांसोबत बोलण्याची सवडच मिळत  नाही. दोघेही नोकरी करणारे असले की ही समस्या अधिक होते. घर आणि ऑफिसच्या धावपळीत ते आपलं नातं मागे सोडून आले असतात.
भांडणं
ज्या गोष्टी आधी खूप चांगल्या वाटायच्या त्या गोष्टींबद्दल काही काळानंतर चीड यायला लागते. मग यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं होतात. पण दोघांपैकी एकजण समजदार असेल तर भांडण पटकन सोडवलं जाऊ शकतं. पण तसं नसेल तर कठीण आहे.
आधीसारखं प्रेम
लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रेम पूर्णपणे संपतं असं नाहीये. पण ते पूर्वीसारखं राहात नाही, ते कमी होतं. आधीसारख्या रोमॅटिंक डेट्‌स, सरप्राईज देणं, प्रमेच्या गोष्टी, अनेक तास सोबत बसणं हे कमी होतं.
संशयाचं भूत
नात्याचा पाया हा विश्र्वासावर रचला जातो. एकदा विश्र्वास गमवला तर नातं टिकवून ठेवणं जरा कठीण होऊन बसतं. आणि विश्र्वास कमी झाल्यावर संशयाचं भूत डोक्यात शिरतं.
नमते घेणे
प्रेम असो वा लग्न भांडण झाल्यावर कुणी एकच सॉरी म्हणतो. एकाने सॉरी म्हटलं की, दोघांमधील वाद संपतो. भांडण मिटतं. त्यामुळे दोघांपैकी एक असा असतोच जो आपली चुकी नसतानाही भांडण मिटवण्यासाठी सॉरी बोलतो.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

गणेशोत्सवात प्रसादासाठी किंवा उपवासासाठी उत्तम पर्याय ''मावा मखाना खीर''

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

वजन मोजण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या वजन मोजण्याची योग्य वेळ आणि महत्त्वाच्या टिप्स

B.Tech in Leather Engineering Technology मध्ये करिअरची संधी; पात्रता, शीर्ष महाविद्यालये, व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments