1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (22:02 IST)

!! नवर्‍याची मैत्रिण !!

कधीतरी कुठेतरी अचानक ती भेटते.
शाळेची, कॉलेजची किंवा आॅफीसातली असते.
 
नीटनेटकी, टापटीप,चटपटीत असते.
कामामध्ये तर ती कायमच perfect  असते.
 
चेहरा कायम हसरा, आणि गोड गोड बोलते.
तिला पाहताच आमच्या ह्यांचे काळीज धडधडते.
 
स्वयंपाक तर ती एकदम Best च करते.
करीयरची गाडी पण नेटाने ती हाकते.
 
रूसवे, फुगवे, हेवेदावे तिच्या गावी ही नसते.
सगळ्यांशी ती कायम मिळून मिसळूनच वागते.
 
तिचे दुःख मात्र नेहमीच डोंगरा एवढे असते.
तिच्या डोळा पाणी येता यांचे काळीज गलबलते.
 
दिमतीला तिच्या स्वारी तयारच असते.
आपले काही चुकते हे त्याच्या गावीही नसते.
 
तिच्याशी बोलताना कळी अशी खुलते.
सगळ्या गोष्टींचे तेव्हा यांना ध्यान असते.
 
तिच्या घरी मात्र खरंच ती अशीच असते?
स्वतः च्या नवर्‍याशी  ही अशीच गोड वागते?
 
बायको पेक्षा मैत्रीण कणभर सरसच असते.
पण.... ध्यानात घ्या रावजी तुमची बायकोही कोणाची तरी मैत्रीण असू शकते!!!
 भारीच ना! 
साभार व्हॉट्सअ‍ॅप