ये इश्क नहीं आसाँ बस इतना समझ लीजे इक आग का दरिया है और डूब के जाना है
छानपैकी प्रेयसीला घेऊन 'डेट'वर जायचंय. मग उशीर कसला करताय. चटकन निघा की. हो पण जाताना ही 'डेट' कशी 'एंजॉय' करायची याचे फंडेही आमच्याकडून घ्या. मग बघा ही 'डेट' कशी अविस्मरणीय होईल ते.
*ऑफिसमध्ये बसला आहात किंवा कॉलेजमध्ये आहात. तेवढ्यात गर्लफ्रेंडचा फोन आला, वातावरण मस्त आहे. चला कुठे तरी फिरायला जाऊया. मग काय अजिबात उशीर करू नका. फक्त छानपैकी बाईक किंवा कारचा बंदोबस्त करा. रस्ता असा पकडा ज्यावर फारशी गर्दी नसेल. थोडक्यात एकांत मिळेल. किंवा हिरवा निसर्ग तुमच्यासोबत असेल.
*डेटवर जाताना प्रेयसीसाठी गिफ्ट घ्यायला विसरू नका. फूल, चॉकलेट, एखादी अंगठी असे काहीही चालेल. तिच्या सौंदर्यात भर घालणारे काही असेल तरीही चालेल. अशा गोष्टींनी तुम्ही तिच्या किंवा त्याच्या आठवणीत रहाल.
*पिक्चर पहायला गेला तर छानच. तिथे एकांतही चांगला मिळेल. हो पण त्यासाठी गाजलेलाच चित्रपट पहायचा अशी कुठे अट आहे. एखाद्या पडेल चित्रपटाला गेलात तरीही एकांत मिळेल. जिथे गर्दी नाही अशा सीट्स बघून बसा म्हणजे झालं. मग काय छोटीशी पार्टीही तिथे करू शकता. स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सच्या साथीने ही पार्टीही रंगेल. तुमच्या एकांताचा कुणीही भंग करायला येणार नाही. आणि हो, इतरांचाही रसभंग तुम्ही होऊ देऊ नका.
*हायवेवर जात असाल आणि मागे प्रेयसी बसली असेल तर हा अनुभव काही औरच नाही का? पण हो जाताना जरा सावकाश जा. वाहनांवर लक्ष ठेवा. गाडीवर जाताना प्रेम बिनधास्त करा. पण काळजीही घ्या. नाही तर उत्साहाच्या भरात भलतंच काही होऊन बसायचं. त्याचवेळी आणखी एक गोष्ट. जरा बाहेर निघालाच असाल तर थोडी लाज बाजूला ठेवा.
*कॉफी हाऊस किंवा गार्डनमध्ये फिरत असाल तर तिच्या कमरेत हात घालून किंवा हातात हात घालून फिरण्यास काहीही हरकत नाही. फक्त टपोरी लोकांचा त्रास होत नाही ना तेवढे पहा.
*पावसात फिरत असाल तर चुकूनही छत्री उघडू नका. नाही तर सगळा मजा घालवून बसाल. प्रेयसीसोबत पावसात भिजण्याचं सुख काय असतं ते अनुभवून पहा.
*एकमेकांसोबत असताना गप्पांचे विषयही तसेच रोमॅंटिक असू द्या. नाही तर घरी काय झालं नि शेजारी काय चाललंय असले विषय चर्चेला आणू नका. मुख्य म्हणजे गप्पांवेळी मोबाईल बंद ठेवा. नाही तर उगाचच 'डिस्टर्ब' व्हाल.
*'प्लॅनिंग' करून जात असाल तर ड्रेस कोणता घालचा ते परस्पर सहमतीने ठरवा.
*विनवणी, समजूत घालणं, रूसवा काढणं यात वेळ घालवू नका. समोरचा काहीसा नाराज दिसत असला तर थोडी चिडवाचिडवी करा. पण थोडी. अती नाही. पण नाहक वेळ घालवणे योग्य नाही..
*हे सगळं करून आल्यानंतर त्याची चर्चा इतर कुणशी करू नका. नाही तर तुमचे भांडे फुटेल आणि सगळ्यांना कळेल. मग सगळा मजाही 'किरकिरा' होऊन जाईल. तेव्हा जा आणि मस्तपैकी एंजॉय करा. काय?