ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस
आजकाल रिलेशनशिपपेक्षा तुम्हाला ब्रेकअपचे वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रिणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही ऐकतच असाल.
आजचे यंग जनरेशन लोकांशी बोलण्यापेक्षा सोशल मीडियावरच जास्त बोलतात. ब्रेकअप झालं की लगेच व्हाट्सअँपवर स्टेटस अपडेट करण्याची प्रत्येकालाच सवय लागली आहे. तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या या व्हाट्सअँप स्टेटसवरून तुम्हाला त्यांचे ब्रेकअप झाल्याचे लगेचच कळेल.
ब्रेकअप झाल्यानंतरचे हे सगळ्यात कॉमन स्टेटस
1. हा शेवटच नाही जर तो हॅप्पी एंडिंग नसेल.
2. कधीकधी एकटं राहणेच चांगलं असतं निदान तुम्हाला कोणी दुखावत नाही.
3. मी या व्यक्तीला नाही मिस करत.. मी जसा विचार केलेला ती व्यक्ती आहे तिला मी मिस करतेय.
4. थोडा वेळ दे, मी नक्कीच मूव्ह ऑन होईन.
5. आपल्या नात्याचा शेवट नाही तर ज्या आठवणी आहेत त्या जास्त त्रास देतात.
6. जेव्हा सगळे ठीक होईल तेव्हाच आता माझ्याशी बोल.
7. प्रेम ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर चूक आहे.