बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (15:17 IST)

Love Relationship Tips : वयात अंतर जास्त आहे ? नातं दृढ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

प्रेम कुणावरही होऊ शकतं. दुसरीकडे, जेव्हा आपण प्रियकराशी हे  बघून प्रेम करत नाही की तो आपल्या पेक्षा वयाने किती मोठा आहे.  किंवा तो दिसायला कसा आहे.  प्रेम आपण आपल्या वयापेक्षा मोठ्या मुलीवर किंवा मुलावर देखील करू शकता. किंवा असे बरेच लोक असतील ज्यांचे पार्टनर वयाने त्यांच्यापेक्षा मोठे असतील. अशा परिस्थितीत आपल्या मधले नाते घट्ट करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला तर मग जाणून घेऊ या. 
1 अपेक्षा बद्दल बोला- प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात.  अशा परिस्थितीत आपल्याला जोडीदाराकडून  काय अपेक्षा आहेत याबद्दल  त्याच्याशी बोलले पाहिजे. याबाबत दोघांनी चर्चा करावी. बर्‍याच वेळा असे घडते की दोघांपैकी एकाला लग्न करायचे असते तर दुसऱ्याला थोडी वाट पाहायची असते, त्यामुळे सुरुवातीला या गोष्टींबद्दल चर्चा करा. 
 
2 वयातील अंतर स्वीकारा- बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की दीर्घ आणि निरोगी बाँडिंगसाठी काँमन आणि म्युच्युअल बॉंडिंग आवश्यक आहेत.  हे नेहमीच शक्य नसते. कदाचित  भावी जोडीदार तुमचा मित्र असेल किंवा तुमच्या घराभोवती राहणारा असेल .अशा परिस्थितीत आपल्या मधल्या वयातील अंतरला स्वीकारले  पाहिजे.आपल्या नात्यात काही मोकळीक सोडा जिथे तुमचा जोडीदार त्यांच्या वेगवेगळ्या सवयी, आवडीनिवडी उघडपणे जगू शकेल. 
 
3 जोडीदाराच्या निर्णयांना सपोर्ट करा - आपल्या जोडीदाराला नोकरीत स्थैर्यता हवी  असेल आणि दुसऱ्याला जोखीम घ्यायची असेल, तर जोडीदाराकडून या दोन गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नका. त्यापेक्षा जोडीदाराला सपोर्ट करा. आपण या प्रकरणावर चर्चा करून तोडगा काढू शकता.