प्रपोज करण्यापूर्वी विचार करा
आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर त्या व्यक्तीला प्रपोज करण्यापूर्वी काही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून मन:स्ताप सहन करावा लागत नाही.
* आर्कषक लुक
तो किंवा ती सुंदर किंवा देखणा आहे हे कारण कोणत्याही नात्यासाठी शुल्लक ठरू शकतं म्हणून हे कारण गृहीत धरू नका.
* आधीची ओळख
तुम्ही लहानपणापासून एकमेकांना छान ओळखत असाल तरी हे कारण प्रपोज करण्यासाठी पुरेसं नाही. तुम्ही जास्त वेळ बरोबर घालवला आहे याहून महत्त्वाचे आहे की तुम्हाला त्या व्यक्तीसोबत रस वाटतो का. त्या व्यक्तीशिवाय जगणं मुश्कील आहे, अशी भावना असल्यास प्रपोज करावे.
* घरच्यांची आवड
आपल्या आई-बाबांना किंवा घरातील इतर लोकांना ती किंवा तो आवडतो अशी कारण असल्यावर तर प्रपोज करण्याचा विचारही करू नये. त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला आविष्य काढायचं आहे म्हणून पालकांपेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या आहे.
* कुटुंब चांगले आहे
कुटुंबासाठी नाही तर स्वत:साठी समोरच्या व्यक्तीशी नातं जोडा. फक्त कुटुंब चांगले आहेत म्हणून ती व्यक्तीही योग्य असेल असं नाही.
* शारीरिक संबंध
काही काळी तुमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते म्हणून मनावर त्याचं ओझं घेऊन प्रपोज करणे योग्य नाही. हे कारण संवेदनशील असलं तरी त्यासाठी लाजिरवाणं होऊन किंवा स्वत:ला दोष देऊन नात्यात बांधले जाऊ नका.
* पैसा, वैभव
पैशांमुळे सुखसोयी मिळू शकतात पण सुख नाही. पैसा सर्वस्व नाही. फक्त वैभव पाहून नात्यात बांधले जाऊ नका. हे नेहमी लक्षात ठेवा की पैशापेक्षा प्रेम महत्त्वाचं असतं.
* स्वत:च्या वयाचा तणाव नको
तुमचे वय झाले आणि इतर मित्रमंडळींची लग्न होऊन मुलंबाळंदेखील झाली म्हणून निराश होऊन तुम्ही कुणालातरी प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहात. असल्या नात्यात घाई करू नका. अन्यथा नात्यात फक्त तडजोड करावी लागेल.
* एकतर्फी प्रेम
तुमच्या नात्यात प्रेम एकतर्फी असल्यास ते टिकून राहील याची खात्री नाही. तुम्ही बळजबरी कुणाकडून प्रेमाची अपेक्षा करतं असाल तर त्यात फायदा नाही. सुंदर नात्यासाठी दोघांचंही एकमेकावर प्रेम असणं जास्त महत्त्वाचं आहे.