काही जणांना 'प्रेम योग' होत असतो तर काहींना 'प्रेम रोग'! पण तसे पहिले तर प्रेम योगापेक्षा प्रेम रोगानेचाच अधिक पसार झालेला दिसतो. प्रेम रोगाचा नायनाट करणारे करणारे औषध मात्र अद्याप संशोधकांना सापडलेले नाही आणि कदाचित ते शोधण्याच्या भाणगडीतही पडणार नाहीत.
आपण समाजात पाहतो, दररोज प्रेमावरून काही ना काही घडत असते. एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. कोणी आपल्या प्रेयसीचे नाव हातावर गोंदून घेतो, तर कोणी ब्लेडने स्वत:वर वार करून घेतो. एवढेच नाहीतर प्रियकरासाठी काही तरूणी स्वत:चा जीव देण्यासाठीही मागे- पुढे पाहत नाहीत. काही मुले तर प्रेमात स्वत:ला विसरून जातात व आपल्या रक्ताने प्रेयसीला पत्र लिहून प्रेम किती नि:स्वार्थ आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.
'नि:स्वार्थ प्रेम' हे परमेश्वराच्या प्रार्थनेप्रमाणे असते. जो व्यक्ती स्वत:वर प्रेम करतो तोच दुसर्यावर प्रेम करू शकतो. 'काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या का रे हृदयी उठला', अशी भावना खर्या प्रियकर व प्रेयसीमध्ये असते. प्रेमात त्यागाची भूमिका महत्त्वाची आहे.