Relation Tips: लग्नानंतर माहेरची खूप आठवण येते, या टिप्स फॉलो करा

Last Updated: मंगळवार, 31 मे 2022 (16:19 IST)
लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं. ज्या घरात ती लहानाची मोठी होते त्या घराला तिला कायमचे सोडून लग्न झाल्यावर दुसऱ्या घरी जावे लागते.

तिला नवीन नातं नवे लोक, नव्या घरात जुळवून घ्यावे लागते. पण खरं तर तिला आपल्या आई-वडिलांना सोडून नवीन घरात जुळवून घेणं सोपं नसतं. नवीन घराचे वातावरण त्या घराच्या माणसांच्या स्वभावाला जुळवून घेणं सोपं नसतं.
लग्नांनंतर नवीन वातावरण तिला सासरी जाऊन माहेरची आठवण येणं अपेक्षित आहे. आई अशी करते, बाबा असं म्हणतात, या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. आपल्या माहेरच्या माणसांना आपल्या बहीण-भावंडाना सोडून आल्यामुळे तिला होम सिकनेस होऊ लागतं. लग्नानंतर आपल्याला देखील माहेरची आठवण येत असल्यास या काही सोप्या टिप्स अवलंबू शकता.

1 एकटे राहू नका-
लग्नानंतर नवी नवरी बहुतेक वेळा तिच्या खोलीतच राहते असे अनेकदा दिसून येते. तिला नवीन असल्यामुळे नवीन कुटुंबात कोणतीही जबाबदारी दिलेली नसते किंवा ती कुटुंबात पूर्णपणे मिसळलेली नसते. जेणेकरुन तिला त्या वातावरणात आरामदायी वाटेल. म्हणूनच तिला तिच्या खोलीत एकटे राहायला आवडते. पण जेव्हा ती एकटी असते तेव्हा तिला तिच्या माहेरची आईबाबांची जास्त आठवण येऊ लागते. अशा वेळी खोलीत एकटे न राहण्याचा प्रयत्न करा. सासू, नणंद किंवा सासरच्या मुलांसोबत वेळ घालवा. यामुळे तुमचं त्यांच्यासोबतचं नातंही घट्ट होईल आणि तुम्ही व्यस्त असल्यानं तुम्हाला माहेरची आठवण कमी येईल.
2 व्हिडीओ कॉलवर बोला-
तुम्हाला माहेरची आठवण येणं स्वाभाविक आहे. पण लग्नानंतर पुन्हा पुन्हा माहेरी जाणे टाळा, आठवण आल्यावर माहेरी फोन करून घरच्यांशी बोलू शकता. आता व्हिडिओ कॉलमुळे सर्व काही सोपे झाले आहे. तुम्ही तुमच्या पालकांना, भावंडांना व्हिडिओ कॉल करू शकता. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आहात असे तुम्हाला वाटेल.

3 तुमच्या आईच्या घरून ऑर्डर केलेले पदार्थ मागवा-
माहेरची आठवण येत असेल, तर आईच्या हाताने बनवलेले तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता. आईच्या हाताने बनवलेले लाडू, किंवा तुमचा आवडता पदार्थ, आईला तयार करायला सांगा आणि तुमच्यासाठी पाठवायला सांगा. तुमची आवडती डिश पाहून तुमचा मूड फ्रेश तर होईलच, शिवाय आईसोबत असल्यासारखे वाटेल. यामुळे तुमच्या माहेरच्या घराची आठवणही कमी होईल.

4 थोडावेळ माहेरी भेटायला जा-
जर तुम्हाला तुमच्या माहेरची खूप आठवण येत असेल आणि माहेर जवळ असेल तर तुम्ही एक-दोन तास तिथे जाऊन आई-बाबांची भेट घेऊ शकता. काही काळ पतीसोबत माहेरी घरी जा आणि सर्वांना भेटा. कुटुंबीयांच्या भेटीनंतर तुम्हाला छान वाटेल. पण लक्षात ठेवा की दररोज किंवा नेहमी घरी जाण्याचा विचार करू नका. सासरच्या लोकांच्या सोयी लक्षात घेऊनच
माहेरी जा.यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!

इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!
काही मंडळींच हे आपलं बरं असतं, त्यांच्या अडचणीत कुणी मदतीला यावं वाटत,

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो, तर अशाप्रकारे ...

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो, तर अशाप्रकारे घ्या काळजी
Causes of Ear Infection during Monsoon: पावसाळ्यात उष्णतेपासून आराम तर मिळतोच पण ...

बारावीनंतर BHM बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करा, ...

बारावीनंतर BHM बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करा, पात्रता, अभ्यासक्रम, नोकरी, पगार जाणून घ्या
अलीकडेच प्रत्येक राज्यात 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांपुढे 12 वी ...

No Onion Garlic Gravy कांदा न घालता भाजीची ग्रेव्ही घट्ट ...

No Onion Garlic Gravy कांदा न घालता भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरा या ट्रिक्स
आज आम्ही तुमच्यासोबत अशा पद्धती शेअर करणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची ग्रेव्ही ...