शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (08:40 IST)

या चांगल्या सवयी आपसातील प्रेम वाढवतात

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सध्या देशात लॉक डाऊन सुरु आहे.लोक आपापल्या घरात राहत आहे.बरेच लोक कंटाळले आहेत. लोकांच्या सवयी बदलल्या आहेत.या मुळे त्यांचे आयुष्य वेगळ्या मार्गाला जात आहे.या काळात बऱ्याच घरात वाद देखील होत आहे, सततच्या भांडणांमुळे नात्यात दुरावा येत आहे.काही सवयी अशा असतात ज्यांच्या मुळे घरात भांडणे होत आहेत. काही चांगल्या सवयी अवलंबवून आपण घरात आपसातील वाद मिटवून  प्रेम वाढवू शकता.चला तर मग जाणून घेउ या.
 
 
1 सकाळी लवकर उठणे- मान्य आहे की सध्या लॉक डाऊन मुळे घरात आहात, परंतु याचा अर्थ असा नाही की सकाळी उशिरा उठावे. सकाळी लवकर उठावे जेणे करून आपला संपूर्ण दिवस वाया जाऊ नये.सकाळी लवकर उठल्याने आपण आपल्या जोडीदाराला आणि कुटुंबियांना जास्त वेळ देऊ शकता.या मुळे त्यांना आनंद होईल. म्हणून रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. असं केल्याने मन देखील निरोगी राहील.
 
2 व्यायाम किंवा योगा करा-सकाळी लवकर उठल्यावर वेळ वाया न घालवता काही हलके व्यायाम करा.योगा किंवा व्यायाम केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.आपण दररोज प्राणायाम देखील करू शकता.असं केल्याने आपले मन आणि शरीर आनंदी राहतील.
 
3 जोडीदार आणि कुटुंबियांचे आदर करा-आपल्याला आपल्या जोडीदाराची काळजी घ्यायची आहे तसेच त्यांना साथ द्या,मान द्या, त्यांना समजून घ्या.आपल्या प्रत्येक निर्णयात त्यांना बरोबर घ्या. त्या शिवाय आपल्याला आपल्या कुटुंबियातील इतर सदस्यांना देखील मान द्यायचा आहे.घरात आई-वडील असल्यास दररोज त्यांचे पायापडून त्यांचे आशीर्वाद घ्या.असं केल्याने आई वडिलांना चांगले वाटेल आणि आपसात प्रेम टिकून राहील. 
 
4 काही नवीन शिका -लॉक डाउन मुळे घरात असल्याने करायला काहीच नाही,अशा वेळी आपण आपल्या या वेळेचा चांगला वापर करू शकता.या काळात आपण काही नवीन शिकू शकता.नवीन शिकायची इच्छा असल्यास वेळे अभावी शिकता आले नसल्यास या काळात शिकून घ्या.