या कारणा मुळे पत्नी पत्नी मध्ये वाद होतात,या गोष्टीना टाळावे
लग्नाला घेऊन प्रत्येकाची काही स्वप्न असतात.तो आपल्या जोडीदारासह कसं आयुष्य घालवणार,एकमेकांना मान देणार,एकमेकांच्या भावना समजून घेणार.आयुष्यात प्रेमच असणार,भांडण आणि वादाला जागाच नसणार.परंतु असे बघण्यात येते की लग्नाच्या काहीच वर्षानंतर त्या दोघात नको त्या कारणावरून भांडण होतात.कधी कधी हे भांडण विकोपाला जातात.असं होऊ नये या साठी कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्यांना टाळणेच योग्य आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
1 स्वयंपाकावरून -पती पत्नीमध्ये होणारे वाद स्वयंपाकाला घेऊन होतात,कधी भाजीत मीठ जास्त होत,तर कधी भाजी चांगली बनली नसेल.अशा परिस्थितीत रागाच्या भरात येऊन पती पत्नीला नको नको ते बोलतात आणि परिणामी त्यांच्या मध्ये भांडण होतात.आणि नातं दुरावू लागत.असं होऊ नये या साठी आपण पत्नीला प्रेमाने सांगा की भाजीत मीठ जास्त झाले आहे.किंवा आपण सुट्टी असल्यास स्वतः स्वयंपाक करा.असं केल्याने पत्नीला आनंद होईल आणि आपलं नातं बहरून निघेल.
2 नातेवाईकांमुळे -बऱ्याच वेळा पती पत्नीमध्ये वाद होण्याला काही नातेवाईक देखील कारणीभूत असतात.काही नातेवाईक असे असतात जे एखाद्या जोडप्याला आनंदात बघू शकत नाही आणि ते पती पत्नींमध्ये नेहमी भांडणे लावायला तयार असतात.ते दोघांना एकमेकांविरुद्ध असं काही सांगतात की ज्यामुळे त्यांच्या मध्ये भांडण होतात आणि ते भांडणे विकोपाला जातात. म्हणून नेहमी इतरांच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जोडीदारावर विश्वास ठेवा.
3 म्हणणे न ऐकल्यावर -जेव्हा आपण लग्नगाठीत अडकता तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकणार नाही.त्यांना आपल्या कोणत्याही निर्णयामध्ये सामील करणार नाही.असं वागणे चुकीचे आहे.आपण एकमेकांना सन्मान दिला पाहिजे.कोणतेही निर्णय घेताना एकमेकांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा.
4 मुलांवरून -लग्नानंतर जोडप्यांची जबाबदारी वाढते.मुलांच्या संगोपनापासून त्यांना मोठं करून योग्य मार्गावर लावण्या पर्यंतची सर जबाबदारी आई-वडिलांची असते. परंतु असं दिसून आले आहे की मुलांनी काहीही चूक केली की त्याचा परिणाम आई वडिलांवर होतो आणि आई-वडिलांमध्ये भांडण होतात.मुलाने केलेल्या चुकी मुळे ते एकमेकांच्या संगोपनाबद्दल बोलतात .ते त्यासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवतात आणि आपसात भांडण करतात.अशा परिस्थितीत मुलांनी चुकीचे वागले असल्यास दोघांनी त्याला समजावून सांगा.