रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

नको ते प्रेम

प्रेम या शब्दामध्ये ब-याच गोष्टी ठरलेल्या आहेत, वर्तमानपत्र उघडले की, एक तरी चांगली, वाईट बातमी प्रेमातून घडलेल्या प्रसंगातून वाचावयास मिळते. एकतर्फी प्रेम ते मुलाकडून असो की मुलीकडून असो, यातून नेहमीच वाईट प्रसंगाला सामोरे जाण्यचा प्रसंग नेहमीच प्रेम करणा-या मंडळींना येत असतो. संगीत, अनुजा, सुजाता, सरिता असो की शुभ्रा, शिल्पा, जान्हवी असो- या सारख्या अनेक मुलींकडून प्रेमात धोका झालेला असतो. यामध्ये अनेक तरुणांनी रागाच्या भरात स्वत:चे तरी जीवन संपविलेले असते किंवा तिचे तरी .... या मुलीप्रमाणेच शंकर, संतोष निर्भय किंवा यांसारख्या अनेक प्रेमवीरांना एकतर्फी प्रेम हे नाव देऊन समाजामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न मुली करतात, अशी बदनामी झाल्यानंतर अ‍ॅसिड हल्ला करणे किंवा स्वत:ला संपविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

प्रेम हे कॉलेजमध्ये उदयास येते, तेथेच ते फुलते. कॉलेज संपेपर्यंत जवळ जवळ बसणारे हे प्रेमवीर पुन्हा घरचे कारण सांगून प्रेमभंग करतात आणि दोन-पाच वर्षे राहिलेले प्रेम अचानक तुटतं.... तेव्हा दोघांनाही आभाळ कोसळल्याचा भास होतो. प्रेम करणा-यांना प्रेम करू दिले पाहिजे पण प्रेमवीराने त्याचा अतिरेकही करू नये. प्रेमाला काळिमा लागणार नाही याची दक्षता घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. हळूहळू वारंवार घडणा-या गोष्टींमुळे प्रेमाचीही किळस येऊ लागली आहे. घरातील वयोवृद्ध मंडळी आज हे लफड्यातले लग्न टिकत नाहीत हे बोलल्याचे आठवते. त्यामुळेच वाटते नको ते प्रेम आणि प्रेमातून नको जीवनसाथी बनण्याचे स्वप्न...!

मुलीला जिवंत जाळले, अ‍ॅसिड फेकले, कॉलेजमध्ये चाकूहल्ला झाला, पळवून नेले, तिच्या भावाने प्रियकराला भोसकले, हात-पाय मोडले यांसारख्या घटनेला कोण जबाबदार? प्रेम करण्यापूर्वीच मुलीनेही आपल्या घरच्यांचा विचार करणे गरजेचे आहे तसेच आई-वडिलांनी आपल्यासाठी ठरवलेला मुलगा म्हणजे आपल्या आयुष्यात येणा-या प्रियकरापेक्षासुद्धा सुंदर आणि अधिकाधिक प्रेम करणारा असतो. आयुष्यातील नवरा म्हणजे सर्वस्व असतो तर मुलाने तिच्या भविष्यातील राखरांगोळी न करता आपण आयुष्यभर प्रेम करू शकतो का?

हेही पाहिले पाहिजे... लग्नाअगोदर फक्त शिक्षण आणि करिअर करणे हे ध्येय ठेवले पाहिजे. प्रेमभंग झालेल्या सर्वच तरुण-तरुणींना नको ते प्रेम... असे वाटत असेल.