1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Husband Wife Jokes in Marathi

नवरा बायको भन्नाट जोक्स

jokes
बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.
नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील...
 
बायको: दोन किलो वाटाणे घेऊ का?
नवरा: हो घे ना, त्यात विचारण्यासारखे काय?
बायको: तुझा सल्ला नाही मागितला रे, यासाठी विचारतेय की, तू इतके सोलू शकशील की नाही, का कमी घेऊ?
 
बायको: अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना मला भीती वाटते.
नवरा: हा म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल.
 
नवरा: आज आपण बाहेर जेऊया गं..
बायको: अय्या ! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो
 
तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही
पुढील लेख
प्रसिद्ध तेलुगू चित्रपट दिग्दर्शक सूर्य किरण यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन