1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
  4. Easy Fish Tacos Recipe

घरच्या घरी २० मिनिटांत तयार! सोपे आणि खमंग फिश टॅकोस रेसिपी

साहित्य-
बोनलेस फिश फिलेट – ३००-३५० ग्रॅम (रोहू, बासा, पॉम्फ्रेट किंवा कोणतीही पांढरी मासा)
मैदा / कॉर्नफ्लोर – ३ टेबलस्पून
काळी मिरी पावडर – ½ टीस्पून
लाल तिखट – ½ टीस्पून
लसूण पावडर / आले-लसूण पेस्ट – ½ टीस्पून
लिंबाचा रस – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी
 
असेंब्लिंगसाठी:
सॉफ्ट टॉर्टिला / छोटी रोटी / चपाती – ६-८
कांदा – १ (बारीक चिरलेला)
टोमॅटो – १ (बारीक चिरलेला)
कोबी / लेट्यूस – थोडी (बारीक चिरलेली)
हिरवी मिरची – १ (ऑप्शनल)
कोथिंबीर – चिरलेली
मेयोनेझ किंवा खट्या दह्याचा सॉस – ३-४ टेबलस्पून
चीज (ऑप्शनल)
लिंबू फोडे
 
कृती-
फिश मॅरिनेट करा
फिशचे मध्यम तुकडे करा. त्यात लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी, तिखट आणि लसूण पावडर घालून १० मिनिटे मुरत ठेवा. नंतर मैदा/कॉर्नफ्लोर लावून हलक्या हाताने कोट करा.
 
फिश तळा
कढईत तेल गरम करून फिशचे तुकडे सोन्यासारखे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. काढून पेपरवर ठेवा.
 
सॅल्सा तयार करा
कांदा, टोमॅटो, कोबी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र मिक्स करा. थोडे मीठ आणि लिंबाचा रस घाला.
 
टॅकोस असेंबल करा
टॉर्टिला गरम करा. त्यावर थोडा मेयो/सॉस लावा व  कुरकुरीत फिश ठेवा आता  सॅल्सा घाला, चीज आणि कोथिंबीर टाका. लिंबू पिळून सर्व्ह करा.
टिप्स
जास्त हेल्दी हवे असल्यास फिश एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये बेक करा.
टॉर्टिला नसल्यास साध्या गव्हाच्या चपातीचा वापर करा.
अतिरिक्त चव हवी असल्यास थोडी चाट मसाला किंवा स्मोक्ड पॅप्रिका घाला.
आवडली तर नक्की ट्राय करा आणि फोटो टाका!Tags:
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुढील लेख
तेलाचा एक थेंबही न वापरता तयार करा ही डिश, हिवाळ्यात नक्कीच ट्राय करून पाहा