Nonveg Recipe : मटणचा खडा मसाला
साहित्य : 500 ग्रॅम मटण पीस, 5 मोठे चमचे तेल, 2 कापलेले कांदे, 1 चमचा किसलेला अद्रक, 4 पाकळ्या लसूण बारीक चिरलेले, 6 लाल मिरच्या, 3 मोठी वेलची, 2 तुकडे दालचिनी, 6 काळे मिरे, 3 लवंगा, मीठ चवीनुसार, अडीच कप पाणी, 2 हिरवी कापलेली मिरची, कोथिंबीर.
कृती : तेल गरम करून कांद्याला सोनेरी होईपर्यंत भाजावे नंतर आलं व लसूण टाकून दोन मिनिट फ्राय करावे. लाल मिरचीचे दोन तुकडे करावे व वेलची, दालचिनी, काळे मिरे, लवंगा व मीठ सोबत टाकावे. मटण टाकून हालवत पाच मिनिट फ्राय करावे. नंतर पाणी घालून कमी आचेवर 35-40 मिनिट शिजवावे. जेव्हा मटण शिजून जाईल आणि पाणी उडून जाईल तेव्हा कोथिंबीर व हिरवी मिरची टाकावी. नंतर सर्विंस डिशमध्ये काढून नान किंवा भातासोबत सर्व्ह करावे.