फिश मोईली
500-800 ग्रॅम पॉम्फ्रेट, पर्ल स्पॉट, म्युलेट किंवा सीर मासा स्वच्छ करून बाजूला ठेवा.
माश्यांना थोडे मीठ, हळद आणि मिरी लावून 15-30 मिनिटे ठेवून द्या. नंतर ते हलके परतून बाजूला ठेवा.
तीन ते चार चमचे तेलात एक चमचा मोहरी घालून खालील पदार्थ परता:
कांदे - 2 (बारीक चिरलेले)
आलं - 2 इंच (तुकडे करून)
लसूण - 10 ते 12 पाकळ्या (चिरून)
हिरव्या मिरच्या - 2 किंवा 3 दोन तुकडे करून
कांदा पारदर्शी झाल्यावर, त्यात चिरलेला टॉमेटो घाला.
पुन्हा परतून घ्या आणि त्यात खाली दिलेले पदार्थ एकत्र दळून किंवा त्यात थोडे पाणी घालून तयार केलेली मसाल्याची पेस्ट घाला:
धणे पूड - 2½ चमचे
मेथी पूड - ½ चमचा
हळद - ½ चमचा
तुम्हाला भाजल्याचा वास येईपर्यंत ढवळा. नंतर दोन ते तीन कप दुसरे नारळाचे दूध (खोबर्याचे दुसर्या वेळी काढलेले दूध) आणि चवीनुसार मीठ घाला.
नारळाचे दूध उकळल्यावर हलके परतलेले मासे त्यात घाला. झाकण ठेवून 15 मिनिटे शिजवा.
नंतर पहिले नारळाचे दूध (घट्ट नारळाचे दूध) घाला. (रस्सा घट्ट करण्यासाठी, पाण्यात दोन चमचे मक्याचे पीठ विरघळून त्यात घाला.)
एक मिनिटभर उकळू द्या आणि आचेवरून खाली उतरवा. वरती थोडी ताजी कोथिंबीर घाला.
साभार : श्रीमती.लेलु रॉय