साहित्य : पत्ता कोबी, 6 अंडी, 1/4 सिरका, 2 चमचे तूप किंवा लोणी, 1/2 कप साखर, 1 चमचा मीठ.
कृती : सर्वप्रथम कोबीला स्वच्छ धुऊन घ्यावी. अंडी उकळून त्याचे काप करावे. कोबीला एका बाऊलमध्ये काढून त्यात 3 अंड्याचे काप व लोणी घालावे. साखर, मीठ व सिरका एकजीव करावे. या मिश्रणाला कोबी व अंड्याच्या मिश्रणात घालून चांगले कालवावे. सलाडाला उरलेल्या अंडीचे काप ने सजवून सर्व्ह करावे.