लागणारे जिन्नस: दोन अंडे उकळवून बारीक कापलेले, 6 स्लाइस ब्रेड, एक उकळलेला बटाटा, एक-दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/2 सिमला मिरची बारीक कापलेली, दोन चमचे चीज किसून, तीन चमचे बटर, दोन चमचे हिरवी चटणी, चवीनुसार मीठ, टोमॅटो सॉस. करावयाची कृती: ब्रेड, दही, चटणी सोडून इतर जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्या. दोन ब्रेडला बटर लावा आणि दोन ब्रेडवर चटणी लावा. बटर लावलेला ब्रेडवर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित लावून घ्या. आणि चटणी लावलेला ब्रेड त्यावर ठेवा. हलक्या हाताने दाबून आपल्याला आवडीप्रमाणे कापून सॉस सोबत सर्व्ह करा. हवे असल्यास टोस्टरमध्ये गरम करून घ्या.