शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

प्रॉन जिंजर सूप

मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : सोललेली कोळंबी एक वाटी, 2 वाट्या पाणी, 1/2 चमचा आलं किसून, चमचाभर सोया सॉस, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर तिखट, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, दीड कप पाणी, अर्धा चमचा बटर.

कृती : साफ केलेल्या कोळंबीचे अर्ध्या इंचाचे तुकडे करावेत. दीड वाटी पाण्यात कोळंबीचे तुकडे उकळी येईपर्यंत झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यावेत व चाळणीवर ओतून वेगळे ठेवावेत. नंतर एका कढईत बटर टाकून पातळ झाल्यावर त्यात चिकन स्टॉक किंवा पाणी घालून त्यात आल्याचा कीस, सोया सॉस, मीठ, तिखट घालून उकळी आणावी. उकळी आल्यावर कॉर्नफ्लॉवर लावून दाट करावं. त्यात कोळंबीचे तुकडे टाकून सर्व्ह करावे.