गुरूवार, 26 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

बटर चिकन

बटर चिकन पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
PR
साहित्य : 1 किलो तंदुरी चिकन, 30 ग्रॅम लोणी, 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, 250 ग्रॅम टोमॅटो प्युरी, 2 चमचे मीठ, 150 ग्रॅम क्रीम, 1 हिरवी मिरची चिरलेली, कोथिंबीर.

कृती : चिकनचे आठ-दहा तुकडे करावे. तेल व लोणीला गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी नंतर टोमॅटो प्युरी टाकावी. दोन मिनिट ढवळून चिकनचे तुकडे टाकावे. आठ-दहा मिनिट शिजवावे. क्रीम घालून एकजीव करावे व 2 मिनिट उकळावे. सर्विंग डिशमध्ये काढून वरून कोथिंबीर व मिरच्यांचे तुकडे घालून सर्व्ह करावे.