मिक्स मटन आलू
|
500 ग्रॅम बोकड्याचे मटन बारीक काप केलेले, 250 ग्रॅम बटाटे, दोन कांदे, दोन टोमॅटो, दोन आलं-लसनाची पेस्ट, दोन ताम्रपत्र, तीन आखे वेलदोडे, इलायची, तीन लवंग, एक चमचा जीरं, एक चमच गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, दोन मोठे चमचे तेल व चवीनुसार मीठ.
पध्दत:
बटाटे कापून त्यांना मीठ लावून अर्ध्या तासासाठी तसेच ठेवा. त्यानंतर बटाटे पाण्यातून काढून घ्या. ते कोरडे झाल्यानंतर तेलात ते तांबूस रंगाचे होइस्तर तळून घ्या. एक कटोर्यात सर्वे प्रकारचे मसाले टाकून मिश्रण तयार करा.
एका कढाईत तेल गरम करायला ठेऊन ताम्रपत्र टाकून कांदा, टोमॅटो चांगल्या प्रकारे कलचून घ्या. त्यानंतर इलायची, दालचीनी, लवंग टाकून त्यानंतर पाच ते सात मिनिटानंतर मटन टाका. त्यानंतर ग्लासभर पाणी टाकून चांगले शिजवा. मटन चांगले शिजल्यानंतर बटाटे टाका. एक-दोन उकडी आल्यानंतर गॅस बंद करून द्यावा. गरमा- गरम मटन- आलू पोळी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
