1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

मुर्गी मा काजू

(काजूसह कोंबडी-पारशी पद्धत)

ND
साहित्य : 1 किलो कोंबडीचे तुकडे, 8 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 1 छोटा चमचा जिरे, 1/2 कप काजू तुकडे केलेले, 1 कप पाणी, 1/2 कप पाणी, 1/2 तेल, 2 कांदे उभे चिरलेले, 3 छोटे चमचे मीठ, 2 मोठे चमचे टोमॅटो केचप, 1 छोटा चमचा साखर.

कृती : आले आणि लसणाचे वाटण करून कोंबडीवर चोळा. साधारण 1 तास मुरवत ठेवा. मिरच्या व जिऱ्याची पेस्ट करावी. नंतर काजूची वेगळी पेस्ट करावी. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. मिरचीचा ठेचा घाला आणि साधारणपणे 3 मिनिटे परता. कोंबडी घालून चांगले परता व पाणी टाकून चांगले मिसळून 5 मिनिट शिजवा. शिजल्यानंतर त्यात काजूची पेस्ट, टोमॅटो केचप आणि साखर घालून ढवळा. रस्सा जाड होईपर्यंत शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा