सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (16:14 IST)

...मातृदिनाच्या शुभेच्छा !!

एक असली न जवळ आई,
जवळ असतं सगळं काही,
उणीव कशाचीच नाही भासत,
असतेच ती सर्व देऊन टाकत,
हात राखून काही नाही करता येत,
वात्सल्या शिवाय काही नाही बघता  येत,
सगळ्या च माता अश्याच असतात,
कुणीही काकणभर कमी नसतात,
म्हणून भेदभाव नाही होणार त्यांच्यात,
म्हणून च त्या देवा पेक्षाही श्रेष्ठ असतात!..
...मातृदिनाच्या शुभेच्छा !!
...अश्विनी थत्ते