मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (13:04 IST)

कां कुणास ठाऊक, कांही कळलंच नाही

old aged
कां कुणास ठाऊक, 
कांही कळलंच नाही   
मन मात्र म्हणतंय जगुन आहे मी
 
कसा संपला २१ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,
कांही कळलंच नाही.
 
काय मिळवलं, काय गमावलं,
काय गमावलं,
कांही कळलंच नाही.
 
संपलं बाळपण,
गेलं तारुण्य
केव्हा आलं ज्येष्ठता,
कांही कळलंच नाही.
 
काल मुलगा होतो, 
केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो, 
कांही कळलंच नाही.
 
केव्हा 'बाबा' चा
'आबा' होऊन गेलो,
कांही कळलंच नाही.
 
कोणी म्हणतं साठी बुद्धी  नाठी,
कोणी म्हणतं हाती आली काठी,
काय खरं आहे, 
कांही कळलंच नाही.
 
पहिले आई बापाचं चाललं,
मग बायकोचं चाललं,
मग चाललं मुलांचं, 
माझं कधी चाललं, 
कांही कळलंच नाही.
 
बायको म्हणते 
आता तरी समजून घ्या , 
काय समजू,
काय नको समजू, 
कां कुणास ठाऊक, 
कांही कळलंच नाही.
        
*मन म्हणतंय जगुन घे.  *,
वय म्हणतंय वेडा आहे मी,
या साऱ्या धडपडीत केव्हा 
गुडघे झिजून गेले, 
कांही कळलंच नाही.
 
झडून गेले केस, 
लोंबू लागले गाल,
लागला चष्मा, 
केव्हा बदलला हा चेहरा 
कांही कळलंच नाही.
 
काळ बदलला, 
मी बदललो
बदलली मित्र-मंडळीही
किती निघून गेले, 
किती राहिले मित्र,
कांही कळलंच नाही.
 
कालपर्यंत मौजमस्ती
करीत होतो मित्रांसोबत, 
केव्हा सीनियर सिटिझनचा 
शिक्का लागून गेला ,
कांही कळलंच नाही.
 
सून, जावई, नातू, पणतू,
आनंदीआनंद झाला, 
केव्हा हासलं उदास हे
जीवन,
कांही कळलंच नाही.
 
भरभरून जगून घे जीवा
मग नको म्हणूस की
"मला कांही कळलंच नाही.