संध्याकाळचा स्वयंपाक हा वाटतो तितका सोपा नसतो
संध्याकाळचा स्वयंपाक हा
वाटतो तितका सोपा नसतो,
सकाळचा एकवेळ परवडला
पण संध्याकाळी नको वाटतो....
चारीठाव स्वयंपाकाने दिवसाची
सुरुवात कशीची छान होते,
पण संध्याकाळी काय करू
या विचारांनीच धडकी भरते....
एक तर सकाळ सारखं
संध्याकाळी नको असतं,
रोज रोज बाहेरून मागवण
तब्ब्येतीला बरं नसतं....
खिचडी तशी सख्खी वाटते
पण रोज कशी करायची ना,
थालीपीठ आणि धिरडी म्हणजे
परत मेहनत आलीच ना....
सकाळचा तो वरणभात
थोडा तरी उरलाच असतो,
त्याला पुरवठा काय करू
हा यक्ष प्रश्न सतावत असतो....
तेलकट नको तुपकट नको
पुलाव बिर्याणी रोज कशी,
त्याला चालतो नुसता भात ही
पण मला पोळी हवी
जराशी....
पोळ्यांचा कुस्करा, फोडणीचा भात
तसा सोपा जातो करायला,
पण त्यासाठी सकाळच्या
पोळ्या नकोत का उरायला....
उसळी,सोजी, सांजा,उपमा
ह्यांना नाष्यात जागा मिळाली आहे,
ब्रेड, पिझ्झा, सँडविच ह्यांच्या
मैद्याने झोप उडवली आहे....
काय करावे सांगा मग
साधी गोष्ट वाटते का?
संध्याकाळचा स्वयंपाक
सांगा तुमची पण झोप उडवतो का?
-Social Media