गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (17:12 IST)

मराठी कविता : तू नव्हता माझा कधीच!

उमगू लागले मला, तू नव्हता माझा कधीच!
गुंतला नव्हता जीव तुझा, माझ्यात केव्हांच!
होती तेंव्हा सोबत तुझी वाटचालीत,
शरीरानं होतास तू तिथं, अर्थ न यासोबतीत !
आलो तरीही इथवर आपण न कळले,
शोधलास तू नवा आधार, मलाच न समजले,
असतं जरी समजलं तरी वेगळं काय बरं घडलं असतं?
लोकं लाजेस्तव का कुणी व्यक्त झालं असतं?
जाऊ तरीही आपण जिथंवर नेईल प्रारब्ध अपुल्यास,
न भेटू पुनः कधीही, जर आलो पुन्हा जन्मास!
......अश्विनी थत्ते