शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (09:23 IST)

Marathi Kavita मन हे असंच असतं उडत पाखरू

मन हे असंच असतं उडत पाखरू,
कल्पनेच्या विश्वात उडत राहतं भुरू भुरू,
कधी केलं असतं प्रेम त्याने,खूप कुणावर ,
पाहीले असतात स्वप्न,न येऊ देता ओठावर,
कधी त्याला गाठायची असतात ध्येय त्याच्या मनातले,
पण कुणीही समजून घेत नाही मनातले,
आपल्या मर्जीने वागायचं असतं मनमुरादपणे,
काही प्रकरणं सोडवायची असतात हळुवारपणे,
पण घडत नाही ना  मनासारखे सर्वच,
प्रत्यक्षात आणि मनाच्या दुनियेतील फरक ही तोच!
...अश्विनी थत्ते.
Published By -Smita Joshi