1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (16:14 IST)

व्हाट्सपची काठी ! म्हातारपणी मिळाली

old man
व्हाट्सपची काठी !
म्हातारपणी मिळाली 
व्हाट्सउपची काठी !
कपाळावरची मिटली 
आपोआप आठी !!  
 
वेळ कसा जातो आता 
हेच कळत नाही ! 
वर्तमान पत्राच पान सुद्धा 
हल्ली हलत नाही !
 
चहा पिताना लागतो 
व्हाट्सअप हाताखाली !
डाव्या बोटाने हलके हलके 
मेसेज होतात वरखाली !
 
कुणाचा वाढदिवस आहे ?
कोण आजारी आहे ?
कोण चाललंय परदेशात 
अन काय घडतंय देशात ?
 
कधी लताची जुनी गाणी तर 
कधी शांताबाई ची कविता ! 
बसल्या बसल्या डुलकी लागते
कधी एखादी गझल समोर येते !  
 
टीव्ही वरच चॅनेल सुद्धा 
हल्ली बदलत नाही 
व्हाट्सउप शिवाय आमचं
पान जरा सुद्धा हलत नाही !!
 
वय जरी होत चाललं
हातपाय जरी थोडे थकले !
तरी व्हाट्सउपच्या औषधाने
मन मात्र रिलॅक्स झाले !! 
 
आता फार काळजी करत नाही
आता चिडचिड सुद्धा होत नाही !
व्हाट्सउप चा मित्र भेटल्या पासून
आता मनात सुद्धा रडत नाही !! 
 
आनंदी कसे  जगायचेे याचे 
आता कळले आहे तंत्र !!
व्हाट्सउप च्या या जादूच्या
काठी ने दिला सुखाचा मंत्र !!