जागतीक गुलाब दिवस...
गुलाब, नुसतं म्हटलं की येतो अंगावर काटा मखमली,
कधी कधी तर खुलते, ओठावर गुलाबी कळी,
कित्ती प्रेमी जीवांच्या प्रेमाची साक्ष व्हायचे भाग्य,
परमेश्वरा च्या डोई वर स्वार होऊन मिरवायचे सौभाग्य,
कधी होई दुरावा मिटवण्याचे कारण सबळ,
कधी आजाऱ्यास देई लढण्याचे बळ,
रंग तरी कित्ती मनमोहक सारे त्यास मिळाले,
सर्वांच्या अंगणात त्यास मानाचे स्थान प्राप्त झाले,
असा हा गुलाब फुलांचा राजा शभतो उठून,
म्हणून आज त्याचे केले कौतुक भरभरून !!
....अश्विनी थत्ते