सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

अपेक्षा

स्व. सौ. मीना दिनकर आठल्ये

अपेक्षा
NDND
अपेक्षा अपेक्षा अपेक्षा
अपेक्षांचे एक मोठे जाळे घेऊन
वावरत असतो भोळा माणूस
उद्याच्या उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे
निश्चितच करतील सुंदर फुलांची उधळण
टपोरी टपोरी सुंगधी फुलं
अपेक्षांची मोहक रंगीबेरंगी फुलं
समीराच्या झोक्यावर डोलणारी फुलं
वेलीवर वृक्षावर फुललेली फुलं
सडाच सडा शिंपलेला फुलांचा
वाकून उंचावून तोडूया म्हटलं
तर कधी उंचावलेली टाच पडते कमी
तर कधी गोळा केलेली सड्यातली फुलं
कुणितरी येऊन परडीतून हिसकावून घेतं
आणि होते केवळ उपेक्षा
NDND
सार्‍या अपेक्षांची उपेक्षा
आणि होतात सार्‍या अपेक्षा भंग
अपेक्षाभंगाचे दु:ख नाही पेलवत
ह्या भोळ्या भाबड्या माणसाला
तेव्हा नको तो अपेक्षाभंग नको त्या अपेक्षा