बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

प्राकृत काय चोरापासूनि आली

संस्कृती ग्रंथकर्ते ते महा कवि मा प्राकृतीं काय उणीवी
नवी जुनीं म्हणावी कैसे कधीं सुवर्ण सुमनें.
कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय नीर
वर्णास्वादे एकचि मधुर दिसे साचार सारिखें
जें पाविजे संस्कृत अर्थे तेंचि लाभे प्राकृतें
तरी न मानावया येथें विषय चित्तें तें कायी.
देशभाषावैभवे प्रपंच परमार्थी पालटली नांवे
परी रामकृष्णादिन नामां नव्हे भाषावैभवे पालटू.
संस्कृत वाणी देवे केली प्राकृत काय चोरापासूनि आली
असो या अभिमानभुली वृथा बोली काय काज.
- संत एकनाथ