बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

राष्ट्रपती दौऱ्यावरील खर्चावर नाराजी

येथे शुक्रवारपासून (ता१८) सुरू होत असलेल्या 81 व्या साहित्य संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येणार असल्यामुळे विविध संघटनांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

साहित्य संमेलनासाठी केवळ दीड तास वेळ देणार असलेल्या राष्ट्रपतींच्या दौर्‍यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च केल्यामुळे काही संघटना नाराज झाल्या आहेत. निषेध म्हणून या संघटनांनी राष्ट्रपती दौर्‍यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

दौर्‍यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त व प्रशासन सज्ज असल्याचे पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.