Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शॉपिंग करण्यापूर्वी नक्की वाचा, खिशावर भार कमी पडेल

Updated: सोमवार, 26 जुलै 2021 (12:43 IST)
 
* एक यादी तयार करा -
सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचे आहे त्याची एक यादी तयार करा. यादी केवळ वाण्याकडील किराण्याचे सामान आणण्यासाठीच नव्हे तर इतर खरेदीसाठी देखील केली जाऊ शकते. आपल्याला कपड्याची खरेदी करावयाची असल्यास तरी ही. आपल्याला करावयाचे इतकेच आहे की आपल्या कपड्यांवर एक दृष्टी टाकायची आहे आणि यादीत लिहून काढायचे आहे की आपल्याकडे कोणत्या प्रकारचे कपडे नाही. किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे खरेदी करणं आवश्यक आहे. असं केल्याने अनावश्यक खर्च होण्यापासून टाळता येऊ शकतं.
 
* फक्त रोख रक्कम बाळगा -
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे लोकांचा कल रोख रकमे पेक्षा डिजीटल पेमेंटच्या दिशेने वाढत चालला आहे. आणि आपण रोख रक्कम घेऊन चाललो आहोत ? होय, आपल्या बजेटमध्ये खरेदी करण्यापेक्षा इतर दुसरा कोणताही योग्य मार्ग नाही. जेव्हा आपल्या पाकिटात खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसे नसल्यास, आपण इतर गोष्टींवर पैसे कसे काय खर्च करू शकता आणि हे आपल्याला अनावश्यक खर्च करण्यापासून वाचवेल सुद्धा.
 
* एकाच ठिकाणी थांबू नका -
एकाच ठिकाणी अडकू नये. मग ते किराणाच्या सामान घेण्याची खरेदी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी असो. एकच ठिकाणी थांबायचे नाही. याच वस्तू आपण दुसऱ्या ठिकाणी देखील बघू शकता. उदाहरणार्थ आपल्या आवडत्या ब्रँडचे कपडे, जोडे ‍किंवा कॉस्मेटिक्स आपल्याला सूटवर इतर कुठल्या दुकान कमी किमतीत खरेदी करता येऊ शकणे शक्य असल्यास त्या वस्तू तेथून घ्यावा. या साठी सर्वप्रथम शक्य तितकी माहिती मिळवून खरेदी करण्याची खात्री करा.
 
* कंटाळा आल्या असल्यास काही ही करा पण खरेदी करू नका -
जेव्हा आपण कंटाळता तेव्हा मोबाइलवर गेम खेळा, चित्रपट बघा, काही नवीन खायला बनवा, पण खरेदारी करू नका. या पैकी सर्वात जास्त धोकादायक भावनात्मक खरेदी करणं आहे. ज्या मुळे आपले सर्वात अधिक पैसे खर्च होतात. अशा प्रकारच्या खरेदी करण्याचे एक नुकसान आहे की या वेळी घेतल्या जाणाऱ्या वस्तू अशा असतात ज्यांचा वापर कधी केला जाणार नाही.
 
* ऑनलाईन पर्याय बघावे -
आजकाल बऱ्याच ब्रँडमध्ये अशा वेबसाइट्स देखील असतात, ज्यामधून कपड्यांना ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतं. या वेबसाइट्सवर चांगली सूट देखील उपलब्ध आहेत. या प्रकरणात आपण स्टोअर मधील कपडे ट्राय करू शकता. जर आपल्याला स्टोअर मध्ये आपल्या योग्य आकाराचे कपडे सापडल्यास, आपण या कपड्यांना ऑनलाईन शोधावे. जर हे कपडे ऑनलाईन वर स्वस्त असल्यास त्यांना वेबसाइट वरूनच मागवावे.
 
* खरेदी करण्यासाठी योग्य भागीदार असणं देखील महत्त्वाचे आहे -
बऱ्याच वेळा असे ही होत की जी व्यक्ती आपल्यासह खरेदी करण्यासाठी गेलेली असते ती देखील आपल्या होणाऱ्या पैशाचा अपव्यवासाठी जवाबदार असते. ती व्यक्ती आपल्याला वारंवार काही नवीन दाखवत असल्यास आणि आपल्याला ते घेण्यासाठी म्हणत असल्यास की ते घेणं चांगले होईल किंवा आपल्याला एखाद्या वस्तूवर सूट मिळत असल्यास अधिक वस्तू खरेदी करण्याचा सल्ला देत असेल तर पुढच्या वेळी त्या व्यक्ती बरोबर खरेदारीला न जाणेच अधिक योग्य ठरेल. आपण अशा व्यक्तींसह खरेदी करण्यासाठी जावं जे आपल्याला अवास्तव खर्च करण्यापासून रोखेल आणि आपल्याला काय घेणं महत्त्वाचे आहे या साठी आपले लक्ष केंद्रित करेल.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

फाउंडेशन लावताना या ५ चुका करताय? मेकअपचा संपूर्ण लुक बिघडण्याआधी हे नक्की वाचा!

रक्षाबंधनाला भावासाठी बनवा मावा अनारसा; तोंडात पडताच विरघळेल, चव लागेल भारी!

बीएमसीने 'जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू केला, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

Spicy Corn Tortilla Chips मार्केटसारखे चवदार मसालेदार मक्याचे चिप्स घरीच बनवा

पुढील लेख
Show comments