माठ खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या
मातीच्या माठाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे बाजारातून माठ खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचे आहे.
* माठ खरेदी करताना माठ फुटलेला तर नाही किंवा त्याला तडातर गेला नाही हे तपासून घ्यावे. तडा असल्यास पाणी गळून जाईल.
* माठाच्या तळभागाला तपासून घ्या जर त्याचा आकार व्यवस्थित नाही तर तो एका जागी स्थिर राहणार नाही.
* सध्या बाजारात टॅप लागलेले माठ येतात जे दिसायला आकर्षक असतात परंतु लवकरच खराब होतात. म्हणून मातीचे साधेच माठ खरेदी करा.
माठाची काळजी अशा प्रकारे घ्या-
* आपल्याला असे वाटत आहे का की,माठाचे पाणी नेहमी थंडगार असावे तर माठाला अशा ठिकाणी ठेवा जिथे सावली असेल. जागा हवादार असावी.
* माठाला जमिनीवर ठेऊ नये त्याला आधी स्टॅण्डवर ठेवा या मुळे माठाच्या तळाला हवा मिळत राहील आणि पाणी थंडगार होईल.
* माठाला मातीच्या झाकणाने झाकून ठेवा. या मुळे पाणी देखील झाकलेले राहील आणि थंडगार राहील.
* माठाचे पाणी दररोज बदलावे. जर दररोज बदलणे शक्य नाही तर आठवड्यातून एकदा पाणी आवर्जून बदला. तसेच आठवड्यातून एकदा तरी माठाला स्वच्छ करावे. माठाला स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही रसायनाचे वापर करू नये. तर माठ पाण्यानेच स्वच्छ करावे.