1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (17:43 IST)

Post Covid: कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यावर थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे अवलंबवा

Post Covid: Use this to relieve fatigue and weakness after recovering  from
उपचारानंतर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होतात, परंतु थकवा आणि अशक्तपणा बरेच दिवस राहतो. अशा परिस्थितीत आवश्यक आहे की अहवाल नकारात्मक आल्यावर काय खावे आणि पूर्णपणे निरोगी होण्यासाठी जीवनशैली कशी अवलंबवावी या कडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. 
 
कोविड नंतर आलेला थकवा कसा दूर करावा ?
डॉक्टरांचा मते,संरक्षणात्मक प्रोटोकॉलचे पालन करून, पोषण, तंदुरुस्ती आणि एकूणच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
* सोपे व्यायाम करा. हळू चालणे, श्वास घेण्याचे व्यायाम आणि ध्यान करून प्रारंभ करा.
* आपल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. कठोर वर्कआउट्स करणे टाळा.
* दररोज सकाळी 30 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. 
* एक खारीक,बेदाणे,दोन बदाम, रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले दोन अक्रोड, सकाळी खावे.
* हलकं आणि सुपाच्य अन्न जसे वरणाचे पाणी आणि भात खावे.
* जास्त साखर,तळकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न वापरणे टाळा.
*  पौष्टिक खिचडी एक दिवसाआड खावी.
* आठवड्यातून 2-3 वेळा शेवगाच्या शेंगाचे सूप प्यावं. 
* जिरे-बडी शोपचा चहा दिवसातून दोन वेळा म्हणजे जेवणानंतर एका तासाने प्यावा. 
* रात्री लवकर झोपावे.जेवढे आपण झोपाल तितके लवकर आपण बरे व्हाल.   
 
रोग प्रतिकारक सुधारण्याच्या काही टिप्स-
* सकाळी लवकर उठणे, सकाळचा सूर्यप्रकाश घेतल्याने आपण ऊर्जावान, सकारात्मक अनुभवता.या शिवाय आपले मूड देखील चांगले होते. शारीरिक आणि मानसिक दृष्टया हे आपणास लवचिक बनवते.  
*प्राणायाम जसे की अनुलोम-विलोम भ्रामरी,कपालभांति,भ्रस्त्रिका दररोज केले जाऊ शकते.
* आपण घरी हर्बल चहा देखील पिऊ शकता. हे आपल्या प्रतिकारक शक्तीला सुधारण्यास मदत करते. 
* गॅझेटचा वापर मर्यादित करा. बातम्या बघा परंतु दररोज एक तासापेक्षा जास्त नाही .
* घरातून बाहेर पडताना मास्क वापर आणि सामाजिक अंतर राखावे.