1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

कपडयांमधून नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास येत असल्यास या टिप्स अवलंबवा

Naphtalene balla
कपडे सुरक्षित राहण्याकरिता अनेक महिला कपडयांमध्ये नॅफ्थॅलीन बॉल्स टाकतात. या बॉल्स हे कपडयांचे रक्षण करतात. तसेच खूप दिवस कपडयांना फ्रेश ठेवतात. पण जेव्हा आपण कपडे घालतो तर काही दिवस कपडयांमध्ये या बॉल्सचा वास येत रहातो. कपडयांमधून येणारा हा नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास जाण्याकरिता या टिप्स अवलंबवा 
 
बेकिंग सोडयाची मदत घ्या- बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतो. याचा उपयोग तुम्ही कपडयातील नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास काढून टाकण्यासाठी करू शकतात. या करिता एका बादलीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात एक कप बेकिंग सोडा घाला. मग यामध्ये कपडे भिजवून नेहमीच्या पद्धतीने कपडे धुवा किंवा कपडयांवर बेकिंग सोडा शिंपडून एक तासाने कपडे उन्हात वाळवू शकता. ही ट्रिक वापरल्यास कपड्यातून येणारा नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास निघून जाईल. 

लिंबाचा रस टाकून धुवावे कपडे- कपडयांमधून येणारा नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास जाण्याकरिता तुम्ही लिंबाच्या रसाची मदत घेऊ शकतात. एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस टाकावा आणि मग त्यात कपडे भीजत घालावे मग साध्या पाण्याने धुवून उन्हात वाळवावे असे केल्यास कपडयातील नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास निघून जाईल.
 
शँपूची मदत घ्या- तुम्ही स्ट्राँग शँपूची मदत घेऊ शकतात. याकरिता एका बादलीमध्ये दोन मग पाणी घेऊन त्यात तीन ते चार चमचे शँपू टाका याला चांगले मिक्स करा. आता तयार केलेल्या मिश्रणात कपडे घाला आणि नार्मल पद्धतीने धुवा. कपडे वाळल्यानंतर त्यातील नॅफ्थॅलीन बॉल्सचा वास निघून गेलेला असेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik