शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (22:20 IST)

गॅस स्टोव्ह घाण आणि काळा झाला असेल,स्वच्छ करण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

घराच्या इतर भागांप्रमाणेच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे, अनेकदा आपण स्वयंपाकघरातील भांडी, फरशी, भिंती याकडे लक्ष देतो पण गॅस स्टोव्हच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाही. अशा परिस्थितीत गॅस स्टोव्हवर डाग आणि घाण साचू लागतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. काही वेळा स्वयंपाक करताना अन्नपदार्थ गॅसच्या चुलीवर सांडतात. अशा स्थितीत गॅस स्टोव्ह काळा आणि घाण होतो. म्हणूनच गॅस शेगडी वेळोवेळी स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे . आजच्या लेखात आम्ही गॅस स्टोव्ह स्वच्छ करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या. 
 
1 मीठ आणि बेकिंग सोडा- गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी मीठ आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा मीठ आणि पाणी मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट स्पंज किंवा कापडात लावून गॅस स्टोव्ह स्वच्छ करा.
 
2 पांढरे व्हिनेगर- आपण पांढरा व्हिनेगर वापरून गॅस स्टोव्ह देखील स्वच्छ करू शकता. यासाठी स्प्रे बाटलीत एक तृतीयांश पांढरा व्हिनेगर आणि दोन तृतीयांश पाण्याने भरा. आता हे द्रव गॅस स्टोव्हवर स्प्रे करा आणि स्पंज किंवा कापडाने स्वच्छ करा.
 
3 डिशवॉशर साबण - गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी आपण डिशवॉशर साबण वापरू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा डिशवॉशर सोप  आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या. आता हे मिश्रण गॅस स्टोव्हवर स्पंज किंवा कापडाने लावा. 2 ते 4 मिनिटांनंतर स्टोव्ह कापडाने पूर्णपणे पुसून टाका.
 
4 गरम पाणी - गॅस स्टोव्हवरील डाग आणि ग्रीस साफ करण्यासाठी आपण गरम पाणी देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी उकळून थोडे थोडे चुलीवर टाका . हे पाणी गॅस स्टोव्हवर थंड होईपर्यंत राहू द्या. त्यानंतर कपड्याने पाणी पुसून टाका.
 
5 हायड्रोजन पेरोक्साइड - गॅस स्टोव्हवर जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी आपण  हायड्रोजन पेरोक्साइड आणि बेकिंग सोडा देखील वापरू शकता. यासाठी गॅस स्टोव्ह स्पॉन्जने किंवा कापडाने पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर स्टोव्हवर बेकिंग सोडा शिंपडा आणि त्यावर हायड्रोजन पेरॉक्साइड टाका. किमान अर्धा तास स्टोव्हवर तसेच ठेवा. यानंतर गॅस शेगडी पाण्याने नीट स्वच्छ करा आणि कपड्याने पुसून टाका.