बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (15:26 IST)

Kitchen Hacks: खल-बत्ता मध्ये दडलेले आहे आरोग्याचे रहस्य, वापरताना या चुका करू नका

अनेक भारतीय घरांमध्ये चहा बनवला जातो तेव्हा आले आणि वेलची ठेचण्यासाठी खल बत्ता वापरतात. अनेकवेळा भाजीमध्ये लसूण, मसाले, आले आणि हिरवी मिरची वगैरे कूटण्यासाठी खलबत्ता वापरतात.
 
अनेक घरांमध्ये अॅल्युमिनियम, लोखंड किंवा दगडी खलबत्त्याचा वापर केला जातो. तथापि, आजकाल लोकांना खलबत्त्याचा योग्य वापर कसा करावा हे माहित नाही. त्यामुळे त्यांना मसाले नीट कुटता येत नाहीत.खलबत्त्याचा योग्य वापर कसा करावा जाणून घेऊ या.
 
अशा प्रकारे वापरा-
खलबत्ता वापरताना काही लोकांना त्यात मसाले कुटता येत नाही. त्याचे कारण खलबत्याचा योग्य वापर होत नाही. खलबत्ता वापरण्याची योग्य पद्धत म्हणजे त्याला हातोड्या सारखे नाही तर गोलाकारात फिरवून साहित्य कुटावे. 
 
कोरडा खलबत्ता वापरा-
खलबत्ता वापरण्यापूर्वी  मसाले कुटण्यापूर्वी त्यात तांदूळ आणि मीठ घाला. नंतर हे कुटून घ्या. नंतर खलबत्त्यात पाणी घालून 10 मिनिटे तसेच सोडा नंतर पाणी फेकून द्या आणि तांदूळ काढून मसाले कुटून घ्या. 
 
दगडी खलबत्ता -
काही जण दगडी खलबत्त्याच्या ऐवजी प्लास्टिक किंवा मेटलचा खलबत्ता आणतात प्लास्टिक किंवा मेटलच्या खलबत्त्यात मसाले चांगल्या प्रकारे कुटले जात नाही.या साठी दगडी खलबत्त्याचा वापर करावा. दगडी खलबत्ता वजनी असल्यामुळे त्यात मसाले चांगल्या प्रकारे कुटले जाते. आपण काळ्या दगडाचा खलबत्ता देखील वापरू शकता. 
 
अशा प्रकारे स्वच्छ करा- 
दगडी खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता. किंवा लिंबाचा ऐवजी बेकिंग सोडा देखील वापर करू शकता. खलबत्यात घाण साचून राहते. जे आपण बेकिंग सोड्याने सहज स्वच्छ करू शकता. 
हे स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम पाणी मध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि हा घोळ खलबत्त्यात घालून काही वेळ तसेच ठेवा नंतर स्वच्छ करून घ्या. 
 



Edited by - Priya Dixit