सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (12:04 IST)

मासिक पाळी उशिरा येण्याचे कारण जाणून घ्या

दर महिन्यात येणारी मासिक पाळी स्त्रियांसाठी एक अभिशाप नसून निसर्गाने दिलेली एक खास भेट आहे, पण जेव्हा ही मासिक पाळी अनियमित होते त्या वेळी हे जणू एक त्रासच वाटतं. बऱ्याचदा आपल्याला ही पाळी उशिरा येण्याचं कारण देखील माहित नसतं. आज आपण या लेखात मासिक पाळी उशिरा येण्याची काही कारणे जाणून घेऊया. 
 
बायका आणि मुलींना दर महिन्यात येणारी मासिक पाळी ज्याला सामान्य भाषेत पिरियड, किंवा मेन्सेस देखील म्हणतात, असे जरुरी नाही की दर महिन्यात एकाच तारखेला येणारं. गरोदरपणाशिवाय ही पाळी उशिरा देखील येऊ शकते. आणि या मागील कारणे वेगवेगळे देखील असू शकतात. 
 
1 कमी वयात पाळी येणं देखील मासिक पाळीची अनियमितता उद्भवतो. ही एक सामान्य बाब आहे. कालांतरानं हे नियमित होतं. यासाठी काळजी नसावी.
 
2 वजन जास्त वाढणं किंवा लठ्ठपणा देखील मासिक पाळीच्या अनियमितपणाचे कारणं असू शकतं. बऱ्याच वेळा हा त्रास थॉयराइडच्या आजारामुळे देखील होतो, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.
 
3 आपल्या दररोजच्या नित्यक्रमामुळे आणि खाण्यापिण्याच्या बदलमुळे देखील मासिक पाळी उशिरा येण्याची समस्यां उद्भवते. अश्या परिस्थितीत आपल्या जीवनशैली आणि आहाराला व्यवस्थित करून पाळी नियमित करू शकता.
 
4 मासिक पाळी उशिरा येण्याचं मुख्य कारण पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम असू शकतं, म्हणून वरील दिलेल्या कारणाशिवाय जर असे काही घडतं तर त्याची तपासणी करावी.
 
5 ताण आणि गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यानं देखील मासिक पाळी उशिरा येते. ओव्हरी म्हणजे अंडाशयावर एक सिस्ट म्हणजे एक आवरण तयार होत त्यामुळे देखील असं होत.